हेल्थी भारतीय लोक
भारतीय लोक आपल्या जेवणात जे मसाले वापरतात ते त्याना अतिशय फिट ठेवतात. तर अश्या बर्याचश्या सवयी त्यांना फिट ठेवतात. भारताची खरी संपत्ति भारतीय समाजातील लोक आहेत. या लोकांच्या प्रकृतिचि काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जर समाज सशक्त असेल तर ते राष्ट्र सशक्त आहे. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी असंख्य जडीबुटी आणि नियमावली बनवली कि जी
| भारतीय साधू एक अमूल्य धरोहर . |
आत्मसात केली तर मनुष्य दीर्घकाळ जिवंत राहून देशाची सेवा करू शकेल.
काही हेल्थी टिप्स सोप्या आणि सहज :-
* सकाळी उठल्यावर दात स्वच्छ केल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे .
* दिवसभर प्रसन्न राहण्यासाठी रोज थोडातरी व्यायाम जरूर करावा .
* तब्ब्येतीच्या बाबतीत वेळेची सबब चालवून घेऊ नका .
* रोज थोडा वेळ योगा ध्यानधारणा आवश्यक आहे.
* सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण भरपूर करावे पण रात्री अतिशय कमी जेवावे .
* मधल्या वेळेत फळे snacks , juices यांचा आस्वाद घ्यावा .
* स्वत:वर नेहमी प्रेम करा .
* शरीर मन आणि बुद्धि सुदृढ ठेवा .
* जेवणानंतर लगेचच झोपू नका .
* रात्री झोपण्यापूर्वी दुध प्या , दिवसभरातील कामाचे मनन करा . देवाचे आभार माना .
वरील सर्व गोष्टी का कराव्यात ?
एक गोष्ट लक्षात घ्या . आपल्याला दुर्मिळ असा मनुष्यजन्म मिळाला आहे. माणसाचे शरीर हा एक चमत्कार आहे नाहीतर आपले डोळे मेंदूच्या जवळ नसते ,गुडघ्यात किवा इतर कुठे तरी असले असते.
| परदेशातील लोकांना योगाचे महत्व समजले. |
# रोजचे चिंतन मनन ध्यानधारणा करण्याचे फायदे :-
रोज नियम बनवून सहज पणे जश्या इतर गोष्टी करतो (उदा . रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापर,निरंतर T .V. पाहणे.इ . )तसेच हि गोष्ट करावी . गोष्ट छोटी आहे पण फायदे अनंत आहेत . रोजचे मनन ध्यानधारणा आपल्यातील आंतरिक क्षमता वाढवतात. नवनवीन गोष्टी ,ज्ञान ,आपण अतिशय जलद गतीने आत्मसात करू शकतो. करियर करताना हे अतिशय उपयोगात येत. आपली प्रतिभा, आपले तत्व समजण्यास मदत होते. जेवढे लवकर हे समजेल तेवढे लवकर आपण आयुष्यात यशस्वी होतो . तेव्हा तुम्ही तुमचे जीवन सोन्यासारखे अमूल्य बनवू शकता . स्त्री असो वा पुरुष सर्व अशक्य शक्य करू शकतात .
आठ दिवस प्रयोग करून बघा .
| ध्यानधारणा हा ज्यांचा नियम ते जगले यशस्वी जीवन. |
क्रमश
No comments:
Post a Comment