Tuesday, 24 November 2015


हिंग ( Asafoetida)





Image result for asafoetida in hindi




भारतीय आहारात  अनेक पदार्थांचा अतिशय खुबीने वापर केला जातो. 

आसाच एक  पदार्थ म्हणजे हिंग . डाळीसाठी  लागणारया  फोडणीत हा अगदी चिमुटभर वापरला जातो.  ज्या भाज्या, उसळी डाळी मुळे पोटात वायू होऊ शकतो त्या पदार्थांना  फोडणी देताना हिंग आवर्जून वापरतात . 

फायदे :

  1. हिंग वातशामक आहे. 
  2. कड धान्यांच्या  उसळी बनवताना  हीग वापरावा  पोटात वायू  होत नाही . 
  3. पोट दुखत असल्यास चिमुटभर हिंग पाण्याबरोबर प्यावे . 
  4. लहान मुलान पोटात दुखत असल्यास बेबीभोवती हिंग पाण्यात घेवून चोळावा . 
  5. पोटाचे सर्व विकार नाहीसे  करण्यात हिंग मदत करतो .
  6. पोटाचे पचनकार्य  सुधारते
  7. पोटातील जळजळ शांत होते 
  8. आंबट ढेकर येणे बंद होते . 
  9. कोलेस्ट्रोल नियंत्रणात येते 
  10. लघवीची जळजळ थांबते 
  11. हिंग खोकला , कोरडा खोकला, अस्थमा  आजारावर उपयोगी ठरतो


 मोहरी (Mustard seeds)

भारतीय आन्नपदार्थामध्ये  मोहरीचे अनन्यसाधारण महत्व आहे . डाळी  व भाज्यांना फोडणीत मोहरी 
 वापरतात. हिला मराठीत  राई  असेही म्हणतात . राईच्या वापरामुळे त्या पदार्थाचे गुणधर्म वाढतात.. 



फायदे :
  1. राई  हि उष्ण आहे, ती पोटातील पचन वाढवते . 
  2. राई हि चांगली पाचक आहे. 
  3. ती फोडणीच्या गरम तेलात /तूपात तडतडलि  कि तिचा गुणधर्म वाढतो . 
  4. मोहरीची पेस्ट  करून sandwich बरोबर खाता  येते . 
  5. मोहरीच्या सेवनाने कफ नाहीसा होतो . 
  6. त्वचेवर मोहरीची पेस्ट रगडून लावल्यास मृत त्वचा नष्ट होते व नवी चमकदार त्वचा येते.  
  7. मोहरीच्या पेष्टचा स्क्रबर सारखा वापर करावा . 
  8. दम्याचा  त्रास असलेल्या व्यक्तीला राई चा वापर विशेष लाभकारी आहे . 
  9. तोंडातील  विकारावर राईचे तेल लावावे. 
  10. केसांसाठी राईचे तेल लाभकारी आहे. 
  11. रुक्ष त्वचेसाठी ,नखांसाठी राई चे तेल लाभकारी आहे. 






                                                                                                                                                       क्रमश 




No comments:

Post a Comment