भारतीय आहारात बऱ्याच प्रमाणात मसाल्यांचा वापर होतो . भारताच्या वेगवेगळ्या भागांत नानाविविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ सापडतात . प्रत्यक विभागातील माणसांच्याराहणीमानाला उपयोगी पडतील अश्या औषधी वनस्पती उगवतात आणि वापरल्या जातात . सर्वसाधारणपणे सर्वच मसाले (spices ) मध्ये लवंग , मेथी दाणा , दालचिनी,तमालपत्र ,तीळ ,धने, जिरे,वेलची, जायफळ , मिरी, बडीशेप,ओवा चाक्रीफुल,दगडीफुल. इ मसाले वापरले जातात.
- लवंग (CLOVES ) :-
- लवंग दातदुखी दूर करते.
- लवंग मध्ये calcium , magnesium,लोह,(iron) विटामिन c , fiber असते .
- लवंग कफ पातळ करते.
- लवंग पचनक्रिया सुधारते . पोटातील वायू नष्ट करते . अपचन उलटी होत नाही.
- तोंडातील दुर्गंधी दूर करते.
- लवंग शरीरातील रक्त शुद्ध करते.
- हि उत्तम antioxidant आहे. सर्दी खोकला bronchitis, sinusitis या श्वास संबधी आजारावर गुणकारी आहे.
- फ्लू च्या तापावर अतिशय गुणकारी आहे.
- यात antibacterial गुण असल्यामुळे हिच वापर टूथपेष्ट , माउथवॉश ,क्रीम मध्ये केला जातो.
- त्वचा रोग होत नाही. तसेच लवंग वापरामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- लवंग कफ व पित्त नाशक आहे .
क्रमश: