काळी मिरीचे फायदे :-
- पोटातील विकारांवर :-
काळीमिरी आणि मनुके दिवसातून ३/४ वेळा चावून खाल्यास पोटातील कृमी नष्ट होतात . तसेच ताकात काळीमिरी पावडर टाकून पिल्यास पोटातील किडे नष्ट होतात . पोटदुखी थांबते . पचनक्रिया सुधारते .
गरम पाण्यात थोडी काळीमिरी पावडर व थोडा लिंबू रस टाकून प्याल्यास पोटातील वायू नष्ट होतो.
काळीमिरीच्या नियमित सेवनाने पोटातील चरबी घामाच्या रुपात शरीराबाहेर टाकली जाते व त्यामुळे वजन नियंत्रणात राहते .
- घसा दुखत असल्यास :-
काळीमिरीची पावडर, बारीक साखर , सुंठ पावडर एकत्र करून मधाबरोबर घेतल्यास , घसा बरा होतो, तसेच आवाजाच पोत सुधारतो .
काळीमिरीचे ३/४ दाणे दुधाबरोबर रात्री झोपण्यापूर्वी चावून खाल्यास कफ निघून जातो .
- डोळ्यांसाठी :-
अस्सल घरच्या तुपाबरोबर काळीमिरीची पावडर सेवन केल्यास डोळ्यांचा नजरदोष दूर होतो . तसेच डोळ्यांचे इतर दोषही दूर होतात .
खोकला झाल्यास:-
काळीमिरीची पावडर गुळाबरोबर चोखून खाल्यास खोकल्यापासून आराम पडतो .
- सर्दी तापावर :-
थोड्या पाण्यात तुळशीची पाने ,आले ,वेलची आणि काळीमिरी उकडून चहा करून प्यावा आराम पडतो .
- अपचन , मळमळ होत असल्यास :-
लिंबाच्या फोडीवर थोडी काळीमिरी पावडर व सैधव मीठ टाकून चाखल्यास ठेकर येणे थांबते .
- दातांसाठी :-
काळीमिरी पावडर आणि सैधव मीठाच्या मिश्रणाने दातांवर मसाज केल्याने पायरीया आजार बारा होतो . दातांना चमक येते . दात मजबूत होतात .
- स्मरणशक्तीसाठी :-
काळीमिरी पावडर व मधाचे मिश्रण नियमित सेवन केल्यास स्मरणशक्ती सुधारते.
- कॅन्सर रोगावर :-
काळीमिरीमध्ये ANTIOXIDANT ,KAROTENS, FLAYONOYDS इ. गुण असल्यामुळे कॅन्सर सारख्या रोगाला प्रतिबंध करतात .
तिळाच्या तेलात काळी मिरे जळेपर्यंत गरम करून कोमट तेलाने दुखऱ्या भागावर चोळल्यास आराम पडतो . तसेच हे तेल arthritis च्या रोग्यालाही लाभकारी आहे .
- केसांसाठी :-
थोडीशी काळीमिरी पावडर दह्याबरोबर केसांना थोडा वेळ लावून नंतर धुतल्यास केसातील कोंडा नष्ट होतो .
- त्वचेसाठी :-
काळीमिरी पावडरिचा स्क्रबर म्हणून वापर केल्यास त्वचेचा पोत सुधारतो. मृत त्वचा जावून ,रक्तसंचार होतो . व त्वचेचा रंग निखरतो .
- स्ट्रेस वर :-
काळीमिरीमध्ये नैसर्गिक रित्या ANTI DEPRESSION चे गुणधर्म आहेत . नियमित सेवनाने ताण तणाव दूर होतो . तजेला येतो .
- मलेरिया झाल्यास :-
काळीमिरी पावडर तुळशीच्या रसाबरोबर घेतल्यास रोग्याला आराम पडतो .
- डोकेदुखी :-:
काळीमिरी जाळून त्याचा धूर नाकाने हुंगल्यास तीव्र डोकेदुखी थांबते. .
अशी हि बहुगुणी काळीमिरी निसर्गाचे एक अनमोल देण आहे . रोगांपासून बचाव करण्यासाठी माणसाने नियमित थोडी काळीमिरी
सेवन केली पाहिजे .
क्रमश :
No comments:
Post a Comment